सुशांत खौतडच्या जलजिवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यात केज जलजिवन कार्यालयाचा हालगर्जी पना का?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सुशांत खौतड यांच्या विजय कंपनीच्या माध्यमातून जलजिवन योजनेच्या अनेक कामे करण्यात आली आहेत परंतु जलजिवन योजनेचे अनेक कामे भोगस करण्यात आली आहे तसेच बोगस काम करत निधी सुध्दा ढापण्याचे काम करणाऱ्या सुशांत खौतड नावाच्या गुत्तेदाराच्या विजय कंट्रक्शनच्या कामाची चौकशी करण्यासाठी केज जलजिवन कार्यालयाची मनमानी सुरू केली आहे याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच केज जलजिवन कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी सुध्दा सुशांत खौतडच्या दावणीला बांधले गेले आहेत का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे आहे कारण केज तालुक्यातील विजय कंट्रक्शन मार्फत झालेल्या जलजिवन योजनेच्या केळगाव,जाधव जवळा,आरणगाव,डोनगाव,टाकळी, कदमवाडी,शिरपुरा येथील काही गावांतील कामे अर्धवट तर काही गावांतील कामे इस्टीमेंन्ट प्रमाणे करण्यात येत नसुन कामे भोगस करण्यात येत आहेत तरी गुत्तेदार सुशांत खौतड यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे कारण ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी पीण्यासाठी खुप मोठा त्रास सहन करावा लागला आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















