सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी किंवा गांज्या लागवडीसाठी परवानगी द्या ,केज तहसीलदारयांना निवेदनाद्वारे केली मागणी !
केज/प्रतिनिधी
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी किंवा गाज्या लागवडीसाठी परवानगी द्या असे मराठा सेवक, अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्षरोहन गलांडे पाटील यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे . या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पहाता शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना गाज्या लागवडीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी रोहन गलांडे केज तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाताला आलेले पीक पुर्ण वाया गेले आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधीही भरुन निघणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आप्पु गाज्या लागवडीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करतो कारण एकीकडे सरकारने कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले ते सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने केले नाही त्या मध्ये निसर्ग कोपला शेतकरी मरणाच्या वाटेवर आहे केज तालुक्यातील त्यामुळे शेतकऱ्यांना पडलेला हा ओला दुष्काळाची खळगी भरण्यासाठी गाज्या लागवडीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.





















