मस्साजोग सरपंच स्व. संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणात आज बीड विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी/ संपत्ती जप्ती संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे!
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आज पहायला गेलो तर अनेक महीणे झाले परंतु संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी आहे आरोपींना फाशीची शिक्षा होयला पाहिजे त्यासाठी आणखी केस कोर्टात सुरू आहे.त्यांच नुसार मस्साजोग सरपंच स्व. संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणात आज बीड विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी.. संपत्ती जप्ती संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.





















