श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्याचा रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. १ व कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. २ या दोन्ही गुळ कारखान्यांच्या २०२५-२६ गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (दि. १०) पारंपरिक रोलर पूजनाने झाला संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटुंब धार्मिक विधीपूर्वक पूजन करण्यात आला या प्रसंगी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्री सिद्धिविनायक परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून ऊस गाळप व्यवसायात सातत्य राखत असलेल्या या दोन्ही युनिट्सबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे मागील हंगामात सुमारे २.२५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते यंदा तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत जलद पेमेंट पद्धत राबवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले ऊस खरेदी झाल्यानंतर अवघ्या १५ ते ४५ दिवसांत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तसेच हंगाम २०२४-२५ मधील उर्वरित ऊस बिलाचा २०० रुपयांचा अंतिम हप्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे या कार्यक्रमाला दिनेश कुलकर्णी,गणेश कामटे, बालाजी कोरे,राजकुमार जाधव, अरविंद गोरे,देविदास कुलकर्णी, गजानन पाटील,मंगेश कुलकर्णी, विकास उबाळे,अभय शिंदे,बालाजी जमाले,संजीव शिलवंत,मकरंद ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देवळे यांनी केले.





















