खामसवाडी येथे समर्थ माळी याचा सत्कार !
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप /धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री कोचिंग क्लासेस च्या वतीने समर्थ धनाजी माळी याचा सत्कार गावातील आय टी इंजिनिअर श्री.विशाल गरड यांच्या हस्ते करण्यात आला. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी असल्यास यश निश्चित मिळते मग ते थोडेसे उशिरा का होईना परंतु ते मिळते असे उद्गार श्री विशाल गरड यांनी व्यक्त केले. समर्थ माळी या विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या इयत्ता पाचवी नवोदय परीक्षेत वेटिंग लिस्ट प्रमाणे त्याचे जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे इयत्ता सातवी साठी निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल त्याचा व त्याच्या पालकांचा या वेळी सत्कार करण्यात आला आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना श्री. विशाल गरड यांचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री विशाल गरड यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध संधी , १० वी नंतर पुढे काय? याबाबत क्लास मधील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी या कार्यक्रमास उपस्थित राहील्या बद्दल श्री कोचिंग क्लासेस च्या वतीने श्री. विशाल गरड यांचा सत्कार करण्यात येऊन श्री कोचिंग क्लासेस चे संचालक श्री .प्रशांत सुरवशे यांनी मनःपूर्वक आभार मानले यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















