शेतक-यांचं सगळं उद्धवस्त झालं आणि तुम्ही मजा बघता/समाज शांत आहे म्हणून त्याला फडणवीसांनी हिणवू नये – मनोज जरांगे पाटील
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
शेतक-यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणारदिवाळीपूर्वी मदतीचं तात्पुरतं आश्वासनं सरकारने दिलं होतं. मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. त्यामुळं देशाला थरकाप उडेल असं मोठं आंदोलन उभं करु, त्यासाठी राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सराटीत बोलावणार आहे. अंतरवाली सराटीत शेतक-यांच्या प्रश्नावर बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा करणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर घेऊन यायचं नाही . दरम्यान यावेळी लाडक्या बहिणींना दिलेली मदतही तात्पुरती असून निवडणुकीत लाडक्या बहिणींना फसवणाऱ्यांचा देव्हारा करावा. शेतक-यांचं सगळं उद्धवस्त झालं आणि तुम्ही मजा बघता. समाज शांत आहे म्हणून त्याला फडणवीसांनी हिणवू नये,धनंजय मुंडे तर गिनतीत नाही. धनंजय मुंडेंची बायको आली ती पण आम्ही बाईच्या आडून वार करत नाही. खून करणाऱ्यांनी, जाती-जातीत भांडणं लावणाऱ्यांनी वारसा चालवायचा ही भुजबळांची भूमिका आहे . मंत्रीमंडळाने काढलेला जीआर रद्द करता येत नाही. आम्हाला दिलं म्हणून फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली. प्रमाणपत्र वाटपाची फडणवीसांची जबाबदारी आहे.





















