डॉ. संपदा मुंडे प्रकरण अंतःकरण हादरवणारी घटना /सरकार कडून न्यायाची अपेक्षा !
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात येथे कार्यरत असलेल्या तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली असून, त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन पोलिस अधिकाऱ्यांवर अत्याचार व छळाचे गंभीर आरोप केले आहेत.ही घटना केवळ वैयक्तिक नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा प्रश्न उभा करते. दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षिततेची हमी मिळावी.डॉ. संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या गैरकृत्याला आणि त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना केवळ दुखद नसून माणुसकीला काळीमा फासणारी आहे असे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे.





















