Homeताज्या बातम्यारुग्णांना खरचं मोफत आरोग्य सुविधा मिळतात का? गंभीर रुग्णांसाठी तात्काळ सुविधांचा अभाव--  ५ लाखापर्यंतचे...

रुग्णांना खरचं मोफत आरोग्य सुविधा मिळतात का? गंभीर रुग्णांसाठी तात्काळ सुविधांचा अभाव–  ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार कागदावरच —शिवसेना तालुकाप्रमुख सोपान( काका ) मोरे/ शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर !

आष्टी प्रतिनिधी/गोरख मोरे

एखाद्या अपघातातील रुग्ण किंवा अन्य आजारातील अति गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार किंवा शस्त्रक्रिया करावी लागते . या प्रसंगी रुग्णांच्या परिस्थितीनुसार नातेवाईक /डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो . त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी पैसे मोजावे लागतात. मग सरकारने राज्यात रुग्णांसाठी सुरू केलेले ५ लाखापर्यंत मोफत उपचार रुग्णांना मिळतात का? असा प्रश्नही आज घडीला निर्माण झाला असून यासंदर्भात मात्र कोणीही ब्र शब्द सुद्धा काढायला तयार नाही , मग खरंच रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळतात का ?असे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिरूर कासार शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी सांगितले   वैद्यकीय महाविद्यालयात मोजावे लागतात पैसे– राज्यात रुग्णांसाठी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराच्या योजना राबविल्या जात असतानाही राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी फीस/ रक्त तपासणी/ एक्स-रे /आयसीयू विभाग आदी बाबीसाठी रुग्णांना पैसे मोजावे लागत असुन रुग्णांना किरकोळ आजारासाठी जर पैसे मोजावे लागत असतील तर मग राज्यात कुठे मोफत उपचार मिळतात? असा सवाल देखील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ )खेडकर यांनी केला  राज्यात गाव /तालुका/जिल्हास्तरावर सरकारी रुग्णालये असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर ,मनुष्यबळ आहे मात्र, या सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत का? हा संशोधनाचा विषय असून गाव /तालुका पातळीवर सरकारी रुग्णालयात फक्त सर्दी, खोकला, ताप तसेच अन्य छोट्या- छोट्या आजारांवर उपचार व रक्त, लघवी तपासणी अशा किरकोळ तपासण्या वगळता अन्य सुविधांपासून रुग्णांना वंचित राहावे लागत असल्यानेच ,रुग्ण सरकारी रुग्णालया ऐवजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर रुग्णाकडून सुरुवातीला तपासणी ,अन्य उपचारासाठी रुग्णालयाकडून भरमसाट आर्थिक लूट केली जात असेल तर , सरकारने राज्यात लाखांपर्यंत गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार हे केवळ कागदावरच दिसत असल्याचे म्हणण्याची वेळ रुग्ण व नातेवाइकांवर आली .गंभीर रुग्णांसाठी तत्काळ सुविधांचा अभाव असून वैद्यकीय महाविद्यालयात मोजावे लागतात पैसे  राज्यात रुग्णांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराच्या योजना राबविल्या जात असतानाही राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी फीस, रक्त तपासणी, एक्सरे ,आयसीयू विभाग आदी बाबीसाठी रुग्णांना रुग्णांना किरकोळ आजारासठी जर पैसे मोजावे लागत असतील तर राज्यात कुठे मोफत उपचार मिळतात? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील रुग्णांची उपचारासाठी होणारी आर्थिक लूट कधी थांबणार? असा प्रश्नही आजघडीला निर्माण झाला असून एखाद्या अपघातात जर रुग्ण गंभीर जखमी झाला आणि शस्त्रक्रिया करावी लागत असेल जर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लाख रुपये खर्च येतो .सरकारच्या महात्मा फुले /जन आरोग्य योजना/आयुष्मान भारत/मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष या सह आरोग्य योजनेमध्ये रुग्णांना मोफत उपचार /शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु, रुग्णालयाच्या वतीने मंजुरीसाठी प्रस्ताव ऑनलाइन पाठविण्यात येतो. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतरच रुग्णांना मोफत उपचार दिले जातात, मात्र प्रस्ताव मंजूर झाला नाही तर , रुग्णाला पैसेच मोजावे लागतात. आणि अति गंभीर रुग्णावर जर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास या मोफत योजनेच्या प्रस्तावाच्या मंजुरीची वाट पाहण्याऐवजी परिस्थितीनुसार शस्त्रक्रिया करावी लागत असून त्यानंतर प्रस्ताव पाठविला व रुग्ण बरा झाला तरच योजनेअंतर्गत रुग्णाला पैसे मिळतात रुग्णालय जो काही उपचार व शस्त्रक्रियेवर खर्च झाला असेल तेवढे पैसे रुग्णाकडून वसुलच केले जातात मग सांगा रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळतात का? असा मुद्दा आता ऐरणीवर आला असल्याचे संयुक्त प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिरूर कासार शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका )मोरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!