गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !
सोलापूर/प्रतिनिधी
स्वच्छ गाव-सुंदर गाव या ब्रीद वाक्याखाली मौजे पाकणी येथे गेले एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक रविवारी दोन तास या मोहिमेअंतर्गत गाव स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. गावातील तरुण यामध्ये सकाळी ६:०० ला उठून प्रत्येक रविवारी एक गल्ली व एक चौक स्वच्छ करून गावच्या विकासात हातभार लावत आहेत त्यामुळे गावातील तरुणांचे कौतुक केले जात आहे.




















