मस्सा शिवारातुन सौरपंप चोरट्यांनी केला लंपास;शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रहिवासी उमेश कल्याणराव गायकवाड यांच्या शेतातून मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून PM कुसुम योजनेअंतर्गत बसवलेला आयडी क्रमांक MK २५०४१३२९९९ कैलास पेजगुडे यांच्या नावे असलेला सौर पंप मस्सा (खं) शिवारातील गट नंबर २५ या क्षेत्रात बोअरवेल वर बसवलेल्या ठिकाणाहून चोरी करून लंपास करण्यात आला असून यामध्ये ७.५ HP च्या एकूण १३ सोलर प्लेट, केबल,फाउंडेशन व मोटर बरोबर इतर अनेक वस्तू चोरून लंपास केल्या आहेत याची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असुन याची तक्रार कळंब पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलिसांकडून स्थळ पंचनामा करून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पो.हे.काॅ गणेश देठे हे करत आहेत.





















