क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम शिराढोन येथे संपन्न!
शिराढोन प्रतिनिधी/तोफीक मोमीन
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज ता: 8.ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 13 क्षय रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत निक्षयमित्र होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले त्यानंतर साई विद्यालय रांजणी येथे शालेय विद्यार्थ्यांना क्षयरोगविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजीत बनसोडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जे एन सय्यद यांचे आदेशावरून जिल्हा क्षयरोग कार्यालय धाराशिव येथील पर्यवेक्षक सुनील उंडरे,संध्या द्वाशे व विस्तार अधिकारी बाबुराव जाधव यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्वर सय्यद यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी हजर होते.





















