जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव या शाळेचे स्पेलिंग बी परीक्षेत उत्तुंग यश!
कळंब तालुका प्रतिनिधी /तोफिक मोमीन
कळंब : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी लागावी तसेच त्यांच्या इंग्रजी विषयाचा शब्दसंग्रह वाढावा.या दूरदृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या नवोपक्रम स्पेलिंग बी” परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव ता.धाराशिव या शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आदर्श सुशिल काकडे याने धाराशिव तालुकास्तरीय “नवोपक्रम स्पेलिंग बी” स्पर्धेत तिसऱ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला.त्याच्या या यशाबद्दल त्याचा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव मैनाक घोष साहेबांनी सत्कार करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .त्याच्या या यशाबद्दल त्याचे व त्याचे वर्गशिक्षक दत्तात्रय पडवळ सर यांचे मा.गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद,मा. विस्ताराधिकारी श्रीम.किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदिश जाकते साहेब व मुख्याध्यापक प्रमोद अनपट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,सर्व शिक्षक वृंद व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.





















