हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात!
कळंब तालुका प्रतिनिधी /तोफिक मोमीन
करजखेडा: तालुका धाराशिव: दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मा. मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य घेतले जात आहे. आता महाराष्ट्र बदलत आहे. तो थांबणार नसल्याचे जलसंपदा मंत्री ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी सांगितले. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्ती कामाचे भूमिपूजन ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी केले यावेळी आमदार मा.श्री.प्रवीण स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन श्री. अरविंद गोरे, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री. सुरेशभाऊ देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, मजूर फेडरेशन चेअरमन श्री. सतीश दंडनाईक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाण्याचा अपव्यय टाळून अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली यावे यासाठी बंद पाईपलाईन योजना प्राधान्याने अंमलात आणली जाणार आहे. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनसाठी १६५ कोटी रुपये तर तेरणा धरण बंद पाईपलाईन योजना कार्यान्वित करण्यासाठी १२५ कोटी रुपये असे एकूण २९० कोटी रुपये बंद पाईपलाईनसाठी आपण देणार असल्याचे जलसंपदा मंत्री ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे निम्न तेरणा उपसा सिंचन योजना आणि तेरणा धरण क्षेत्रातील सिंचन क्षेत्रात मोठी होणार आहे.





















