छ्त्रपती शिवाजी महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन’ शिबीर संपन्न!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलग्नित छ.शिवाजी महाविद्यालय कळंब,आयक्युएसी व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ऑगस्ट २०२५ रोजी ‘व्यक्तिमत्व विकास व मानवी मूल्ये मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सौ.आस्मा सय्यद (केज) यानी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व जीवनमूल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पुढे त्या म्हणाल्या जीवन सक्षम करण्यासाठी आईवडील व शिक्षक यांचे मोलाचे योगदान असते समाजामध्ये एक यशस्वी व सर्वगुणसंपन्न व्यक्ती म्हणून वावरायचे असेल तर त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे हा विकास केवळ पुस्तके वाचून होणार नाही तर त्यासाठी जीवन मूल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी महाविद्यालयाचे अमुल्य योगदान असते.तसेच भविष्यात उंच शिखर गाठण्यासाठी जीवन मूल्यांचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप प्राचार्य.डॉ.हनुमंत माने यानी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सुनिता चोंदे तर सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले व आभार डॉ.विद्युलता पवार यांनी मानले कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यशस्वीपणे पार पडला.





















