विकास मुंडे यांची वडवणी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड!
वडवणी/प्रतिनिधी
आमदार प्रकाश दादा सोळंके नेहमीच तरुण युवकांना राजकारणात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देत आले आहेत. वडवणी तालुक्यातील चिखल बीड सारख्या ग्रामीण भागातून आलेले विकास मुंडे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करून वडवणी तालुक्यात युवकांचे नेतृत्व करण्याची संधी ग्रामीण डोंगर पट्ट्यातील युवकाला दिली आहे.विकास मुंडे यांचे राजकारणात चिखलबीड सारख्या गावचे सरपंच पद सांभाळत गावचा विकास करून दाखवला आहे. त्यांच्याजवळ असलेले हे नेतृत्व आणि युवक कार्यकर्त्यांची जोडण्याची कौशल्य पाहूनच आमदार प्रकाश दादा सोळुंके व जयसिंग भैया सोळंके यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस युवक वडवणी तालुका अध्यक्ष पदाची जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व तरातून त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात पक्ष, कार्यकर्ता संघटन वाढवण्यासाठी सर्व परी प्रयत्न करणार असल्याचे विकास मुंडे यांनी सांगितले आहे.





















