आ.पती अक्षय मुंदडा तुमच्या प्रतीष्ठानचे कॉलेज कुठे आहे?/आजपर्यंत प्रतीष्ठानच्या नावाखाली सरकारला लुटले?
केज/प्रतिनिधी
केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार पती यांनी केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाला वेड्यात काढले आहे कारण कुंबेफळ येथे अक्षय भैय्य मुंदडा यांच्या नावाने प्रतिष्ठान काढुन आज पर्यंत मतदार संघ लुटुन खाल्ला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की शासन महसूल व वन विभाग मुल्य मुंबई यांनी त्याचे संदर्भीय अक्षय मुंदडा सचिव अक्षय सेवा प्रष्वाण पुणे, यांना मौजे कुंबेफळ ता. केज जि. बीड येथील स.न. १७५ सभील ३८ ६० आर जमीन १३३८ २०/०८/०८नुसार श्री. एस. सी. नसिंग, फिजिओथेरपी, बिएम् एलटी या महाविद्यालयाना शैक्षणिक प्रयोजनासाठी अक्षय सेवा प्रतिष्ठाण पूणे या संस्थेस शासन निर्णय महसूल व वन विभाग एलआरएफ १९९२/८७/७-दिनांक ३०/६/१९८२ मधील तरतूदीनुसार जमीन मुजूरीच्या आदेशाच्या दिनाकाच्या लगतपूर्व ५ वर्ष आधिच्या वर्षाच्या १ जानेवरी रोजी असलेल्या बाजारमूल्याच्या २५ टक्के किमत आकारावयाचे ज्ञापनात नमूद करण्यात आले आहे. सदर जमीनीची सन २००८ची शिवगणकानुसार होणारी बाजारभावाची कब्जेहक्काची किमतरुपये १९८००० रपये अक्षरी एक लाख आठ्यानो हजार रुपये आहे त्याचे २५ टक्के रक्कम रुपये ४९५०० अकरी एकोनपन्नास हजार पाचशे रुपये वसूल करून महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीची विल्हेवाट) नियम १९७८ नियम ६ मधील तसेच शासन महसूल व वन विभाग निर्णय क्र. मुलभारएक १०८३/७११३४/प्र.क्र.३४७८/ग-६दिनांक ८/२/१९८३वशासन महसूल व वन विभाग निर्णय क. एलआरएएफ १०००/प्र. क्र.८५/ज-१. दिनाक २०/७/१९९२ मधील अटी शर्तीवर तसंच इतर अटीवर मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे श्री अक्षय मुंदडा सचित अक्षरा सेवा प्रतिष्ठाणचे काॅलेज गेले कुठे असा सवाल उपस्थित केला जात नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे .





















