गौतमी पाटीलचा शेतकऱ्यांना ५१ हजार रुपये मदतीचा हात!
मुंबई/प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी देशोधडीला लागला. या कठीण काळात बळीराजासाठी अनेक क्षेत्रांतून मदतीचे हात पुढे येत असताना, बहुतांश मराठी कलावंतांनी अलिप्त राहणे पसंत केले. दुसरीकडे नृत्य कलावंत गौतमी पाटील हिने मात्र पुढाकार घेत आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांप्रति आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.काही अपवाद वगळता पडद्यावर शेतकऱ्यांचे अश्रू दाखवून लोकप्रियता मिळवणाऱ्या मराठी कलावंतांनी पूास्तांकडे पाठ फिरवली आहे. कलावंतांची ही असंवेदनशीलता ‘माझी मदत फार मोठी नाही याची जाणीव मला आहे. पण त्यातून मला शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे,’ असे गौतमी पाटील यांनी सांगितले. संकटाच्या वेळी आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे ही खरी माणुसकी असल्याची भावनाही तिने व्यक्त केली, त्यामुळे खूप अस्वस्थ झाले, मात्र आपल्याकडून फुल ना फुलाच्या पाकळीएवढी मदत करून मला थोडे बरे वाटले. असेही गौतमी पाटील यांनी म्हटले आहे.





















