चिंचोली माळी येथील जिओ कंपनीचा मनमानी कारभार?-दहा दिवसा पासून टाॅवर बंद/रेंजचा प्रोब्लेम, कर्मचारी, अधिकारी लक्ष कधी घालणार?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील जिओ कंपनीचे टाॅवर वर विज पडल्या मुळे टाॅवर अनेक दिवसांपासून बंद असल्याने चिंचोली माळी येथील जिओ कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत कारण अनेक नागरिकांचे रिचार्ज उपलब्ध असुन नसल्यासारखे झाले आहे कारण जिओ कंपनीचा टाॅवर बंद पडल्याने रिचार्जचा काही उपयोग होत नाही त्यामुळे जिओ कंपनीवर ग्राहकांची नाराजी वाढली आहे दहा ते पंधरा दिवस झाले चिंचोली माळी येथील टाॅवर बंद पडले आहे परंतु आणखी सुध्दा जिओ कंपनीचे अधिकारी, कर्मचारी कुणीही तेथे उपस्थित झाले नाही किंवा काय झाले आहे ते सुद्धा पाहीले नाही आसा भोंगळ कारभार जिओ कंपनीचा सुरू झाला आहे तरी संमंधीत प्रशासनाने तातडीने बंद पडलेले टाॅवर सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चौकट:
जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी दहा ते पंधरा दिवस लागतील असे म्हटले तर मग एका महिन्या नंतर नेटवर्क सुरळीत करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रिचार्ज काय तुमचा बाप परत देनार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





















