धारूर शहरात आचारसंहितेचा भंग/स्थानिक नेत्यांकडून मंत्र्यांच्या नावाने निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव!
बीड/प्रतिनिधी
धारूर शहरात नगरपरिषद निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग होत असून अन अधिकृतपणे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. याबाबत तक्रारी केल्यास स्वतःला मोठे समजणारी स्थानिक नेते आमची सत्ता आहे मंत्र्यांची नावे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत.याबाबत माहिती अशी की निवडणूक आचारसंहितेमध्ये कोणत्याही ठिकाणी पोस्टर बॅनर लावायचे असेल तर संबंधित घर मालकाची परवानगी घ्यावी लागते. परंतु काही स्थानिक नेते आपण मोठे आहोत असे समजून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत पणे बॅनर लावत आहेत याबाबत विचारणा झाल्यास आमची सत्ता आहे असे म्हणत विविध मंत्र्यांचा उल्लेख करत निवडणूकअधिकाऱ्यांवर चक्क दबाव आणत असल्याच्या प्रकार धारूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये घडत आहे. यातून चुकीचा पायंडा धारूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये. निवडणूक आचारसंहितेमध्ये कोणताही प्रचार करावयाचा असेल बॅनरबाजी करावयाची असेल तर रीतसर परवानगी घ्यावी लागते परंतु शहरांमध्ये परिसर परवानगी घेताना तुरळक उमेदवार दिसत आहेत परंतु काही उमेदवार आम्ही फार मोठे आहोत असे समजून अन अधिकृतपणे शहरात विविध ठिकाणी बॅनर बाजी करत आहेत. यातून आचारसंहितेचा भंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व धारूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी याबाबत कारवाई करणे अपेक्षित आहे.





















