Homeताज्या बातम्याकेकतसारणी येथे श्री संत साई बाबा मंदिरात भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा...

केकतसारणी येथे श्री संत साई बाबा मंदिरात भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव,तीन दिवसीय मह़ोत्सवाला आजपासून सुरुवात !

केकतसारणी येथे श्री संत साई बाबा मंदिरात भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव,तीन दिवसीय मह़ोत्सवाला आजपासून सुरुवात !

केज/प्रतिनिधी

केकतसारणी ता.केज, जि.बीड येथे श्री संत साई बाबा मंदिरात आयोजित भव्य कलशारोहण सोहळा,मूर्ती प्राणप्रतिष्ठा व यज्ञ महोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असून गावात सर्वत्र धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे.भक्तिमय वातावरण,मंदिराची सजावट,दीपमाळा आणि धार्मिक पताकांच्या सजावटीने परिसर आधीच उत्सवी बनला आहे.दि.२४ नोव्हेंबर स़ोमवारी मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होणार असुन सोमवार, दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.ढोल-ताशे, लेझीम पथक,भजनी मंडळ व साईनामाच्या गजरात निघणाऱ्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होणार आहेत.गावातून निघणाऱ्या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सोमवारी संध्याकाळी ९ ते ११ भावरत्न गुरुदास विविध कथा व किर्तनकार ह.भ.प.श्री समाधान महाराज शर्मा,ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवार केजकर यांचे हरी किर्तन होणार आहे. त्यांनी साईबाबांच्या चरित्रावर खुप कथा केलेल्या आहेत.दि.२५ नोव्हेंबर रोजी मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प.श्री.कबीर महाराज आतार(राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते सातारा) यांचे भव्य कीर्तन होणार आहे.त्यांच्या कीर्तन-प्रवचनाने भक्तांना अध्यात्मिक चिंतनाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.दि.२६ नोव्हेंबरला प्रमुख कार्यक्रम मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दुपारी १२ वाजुन ११ मिनीटांनी होणार आहे.बुधवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.श्री.महंत भगवान महाराज शास्त्री (साधू शिवराम पुरी मठ संस्थान वरपगाव) यांचे कीर्तन होणार आहे.प्राण प्रतिष्ठा विधीनंतर सर्व भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिर परिसरात आकर्षक सजावट.साईबाबांचा सुशोभित मंडप,पारंपरिक फुलांची आरास,तोरणांनी नटलेले प्रवेशद्वार आणि दिव्यांची सजावट यामुळे मंदिर परिसर सणा सारखा उजळून निघाला आहे. आयोजकांनी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची,बसण्याची व पार्किंगची उत्तम व्यवस्था केली आहे.आयोजकांची माहिती या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुजान रबर प्राॕडक्ट,मुंबई आणि साई परिवार,केकसारणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.आयोजकांनी सर्व श्रद्धावान भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा सफल करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!