चिंचोली माळी येथील भुरटे पुढारी फक्त निवडणूकीसाठी आरक्षणाच्या लढाईत/इतक्या दिवस काय झोपले होते का?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील काही भुरटे पुढारी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या हेतूने मराठा आरक्षण लढाईत चमकत आहेत या अगोदर सुध्दा अनेक आंदोलने झाली अनेक आरक्षणाच्या सभा झाल्या परंतु त्यांना आरक्षण लढाई काय आहे हे सुद्धा माहीत नव्हते परंतु आता त्यांना जाग आली या अगोदर ते मराठा समाजाचे आहेत का असा प्रश्न निर्माण केला जात होत होता परंतु येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आरक्षणाची लढाई आठवली आरक्षणासाठी मराठा समाज झगडतो आहे याची जाणीव झाली तसेच त्यांना अगोदर कुणी ओळखायला सुध्दा तयार नव्हते अशा भुरट्या पुढाऱ्यांचे काम असे झाले आहे चार दिवसात आणी कोल्ह ऊसात अशा मराठी म्हणी प्रमाणे चिंचोली माळी येथील काही भुरट्या पुढाऱ्यांचे काम झाले आहे तसेच हेच भुरटे पुढारी अगोदर संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना नाव ठेवत होते पाटलांना आरक्षण मिळत नसते असे हेच भुरटे पुढारी म्हणत होते असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















