छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडणाऱ्यावरा कार्वाही कधी होणार/पोलिस प्रशासन निष्क्रिय का ?
संपादकीय/रोहन गलांडे
मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई आशयाचे तेलगाव खुर्द येथील बॅनर अज्ञात माथेफिरू समाजकंटकाने फाडले आहे व मराठा समाजाकडून असल्या नीच वृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे जाणीवपूर्वक कोणीतरी समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण व्हावे म्हणून असे कृत्य करत आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर फाडून काही समाजकंटकांना काय मिळणार आहे ते आमच्या हृदयात आहेत असे मराठा समाज बांधवांन कडुन भावना व्यक्त करण्यात येत आहे पण ह्यातून समाज कंटकांची नीच प्रवृत्ती पाहायला मिळते. बॅनर फाडणाऱ्या अशा कुकर्मी नीच प्रवृत्तीच्या समांज कंटकांचा तात्काळ पोलिस प्रशासनाने छडा लावला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





















