बेंगळवाडी २० वर्षीय मराठा सेवक विष्णू हनुमंत रोमन चा मृत्यू!
केज/प्रतिनिधी
मुंबई आंदोलनातील आंदोलक परत आल्यानंतर ठिकठिकाणी गावपातळीवर विजय साजरा करत आहेत. केज तालुक्यातील विडा नजीक असलेल्या बेंगळवाडीतील युवकांनी गावातील सप्ताह मुळे एक दिवस नंतर गुरुवारी रात्री उशिरा गावात आंदोलन यशस्वी झाल्यामुळे विजय उत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात अतीआनंदाने भारावून जाऊन विष्णू रोमन यांने भाग घेतला. मित्राबरोबर तेही उल्हासित होऊन नाचले. मात्र अत्यंत सडपातळ व अशक्त शरीर असल्याने त्यांना कांहीं वेळ नाचल्यानंतर चक्कर आली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण आंदोलन काळात विष्णू रोमन यांनी सोसियल मीडियावर या आंदोलनाला खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या योगदानाला मराठा समाज विसरणार नाही. अत्यंत सामान्य व गरीब परिस्थिती असलेल्या विष्णू च्या आईवडील व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराचे भविष्यच नियतीने हिरावून नेले आहे.आज दुपारी विष्णू हनुमंत रोमन यांच्यावर बेंगळवाडी येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.विष्णू हनुमंत रोमन यांना सकल मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.





















