केज पोलिस स्टेशन व आवाद कंपनीचे काय कनेक्शन?/गुन्हा दाखल झाला पन आरोपीला अटक का नाही?/अरोपी कडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका?
केज/प्रतिनिधी
केज येथील धारुर रोड केज येथे भोसले वस्ती येथे अवादा कंपनीचे काम सुरू आहे व आवादा कंपनीच्या कामगार व आवादा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अरोपीला अटक करण्यात आली असे फिर्यादी यांनी म्हटले आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक 03/09/2025 फिर्याद मिरा गोरखनाथ थोरात वय 40 वर्ष, व्यवसाय घरकाम/शेती, रा. धारुर रोड केज ता. केज जि.बीड (जातमराठा) यांनी पोलीस ठाणे केज येथे हजर राहून तोंडी सांगुन तक्रार देली की वरील ठिकाणी कुटुंबासह राहतो व शेती करुन उपजिविका भागवतोत. केज धारूर रोड येथे सर्वे नं. 174 मध्ये दोन एकर शेती आहे. आमचे शेतालगतच सर्वे नं. 176 मध्ये स्वाती पांडुरंग भोसले व शंतराम गोपाळ भोसले, सुर्यकांत दासराव तेलंग, बलभीम मुरलीधर तेलंग यांची शेती आहे. दिनांक 03/09/2025 रोजी दुपारी 01.00 वाजण्याच्या सुमारास आमचे शेजारील वरील शेतकरी व आम्ही असे शेतात असताना आवादा कंपनीचे काम करणारे लोक आमचे शेतात येवुन त्यांचे कंपनीचे कामकाज करु लागल्याने आम्ही त्यास विचारपुस करण्यासाठी गेलो असता वरील अरोपीने आम्हाला शिविगाळ करुन तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणुन चार अरोपी यांचे विरुध्द तक्रार आहे. असे फिर्यादी यांनी म्हटले आहे परंतु गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना केज पोलिस स्टेशनने अटक केली नाही किंवा कुठल्याही प्रकारची समज दिली नाही त्यामुळे फिर्यादी यांनी म्हटले आहे की केज पोलिस स्टेशन व आवाद कंपनीचे काय कनेक्शन ,गुन्हा दाखल झाला पन आरोपीला अटक का नाही,अरोपी कडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे असे फिर्यादी यांनी म्हटले आहे.





















