बिबट्याने दोन घोडे व १६ जनावरे जिवे मारली/अंबाजोगाई वनविभागा गोट्या खेळत आहे का ?
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे व तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे तसेच बिबट्याने धुमाकूळ घालत दोन घोडे व १६ जनावरांचा जिव घेतला आहे तरी सुद्धा वनविभागाचे अधिकारी कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नाहीत मग वन विभागाचे अधिकारी काय गोट्या खेळत आहेत का एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकाट सुटलेल्या बिबट्याने नुकसान केले आहे परंतु अंबाजोगाई वनविभाग व संमंधीत प्रशासन हालचाल करताना दिसत नाहीत मग काय मानस मारल्यावर हालचाल करणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच शासन पगार नेमका कशासाठी देते वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना झोपा काढायला देत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी अंबाजोगाई वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





















