मराठा आंदोलकांकडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक डोनजा शाळेस खाऊ वाटप!
परांडा प्रतिनिधी-जोतिराम घोगरे
परांडा तालुक्यातील डोनजा येथे मराठायोद्धा मा. मनोज दादा जरांगेपाटील यांनी आझाद मैदान मुंबई येथे केलेल्या आंदोलनामुळे मराठ्यांना मिळालेले आरक्षण हे मराठा समाजासाठी दिवाळी पर्वणी पेक्षा कमी नाही. डोनजा गावातील सकल मराठा समाज यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीची भावना जपत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिकशाळा डोनजा येथील विध्यार्थी यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.यावेळी सकल मराठा समाज डोनजा आणि गावकरी यांचे आभार शाळेच्या वतीने सह शिक्षक गिरी सर यांनी व्यक्त केले.





















