Homeताज्या बातम्याद. युवा ग्रामीण पत्रकार संघाचा "काव्यरत्न" राज्यस्तरीय पुरस्कार कवी आत्माराम शेवाळे यांना...

द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचा “काव्यरत्न” राज्यस्तरीय पुरस्कार कवी आत्माराम शेवाळे यांना प्रदान!

द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचा “काव्यरत्न” राज्यस्तरीय पुरस्कार कवी आत्माराम शेवाळे यांना प्रदान!

अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे

वाघोली येथील प्रगतशील शेतकरी आणि मराठी साहित्यातील सरस्वतीचे उपासक असलेले शीघ्र कवी कवी आत्माराम शेवाळे यांना द .युवा ग्रामीण पत्रकार संघाचा 2025 चा साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा काव्यरत्न पुरस्कार नुकताच अहिल्यानगर येथे समारंभपूर्वक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अग्निशमन दलाचे जिल्हाप्रमुख शंकर मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, रामदास ताठे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नांदेड, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, पत्रकार संघाचे राज्य सचिव कविवर्य बाळासाहेब कोठुळे, राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते, पुणे जिल्हा प्रमुख शकील मणियार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेवाळे यांनी साहित्य क्षेत्रात गेली वीस वर्षे भरीव योगदान दिले आहे. तालुका पातळीवरील काव्य संमेलनापासून तर अखिल भारतीय काव्य संमेलनापर्यंत त्यांच्या कवितेने घौड दौड केलीआहे. ग्रामीण साहित्याचा प्रवास घेऊन जाणारी त्यांची कविता अनेक रसांनी युक्त असते. शेती आणि माती हा त्यांच्या कवितेचा आत्म असतो. साधे शब्द परंतु मनाचा ठाव घेणारी त्यांची लेखणी वाचकांच्या काळजाला स्पर्श करून जाते. अवतीभवती घडलेल्या घटना आणि प्रसंगावर तत्परतेने ते काव्य सादर करून रसिकांच्या मनाला त्यांची कविता भावली जाते. त्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना सर्वजण शिग्र कमी म्हणून ओळखतात. दैनिक सार्वमत, दैनिक लोकमत, दैनिक लोकशक्ती या वर्तमानपत्र मधून सातत्यपूर्ण त्यांच्या कवितेचा प्रवास पाहायला मिळतो त्याचबरोबर दिवाळी अंक साप्ताहिक यामधूनही त्यांची कविता झळताना दिसते. कवितेने आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत . साधी राहणी व “साहित्यिक विचारसरणी”ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्यामुळे राज्यामध्ये त्यांचा मोठा संपर्क असून या सर्व बाबींचा विचार करून द युवा ग्रामीण पत्रकार संघाने त्यांना 2025 चा काव्यरत्न हा किताब बहाल केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल एकता फाउंडेशन चे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, कवी राजेंद्र उदारे, प्रदीप बोडके, गोरक्ष पवार, बेनझीर शेख, मोहनिराज होन, रूपचंद शिदोरे, बाळासाहेब मंतोडे, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!