Homeताज्या बातम्याकृषी तंत्र विद्यालयात शाश्वत शेती दिन साजरा!

कृषी तंत्र विद्यालयात शाश्वत शेती दिन साजरा!

कृषी तंत्र विद्यालयात शाश्वत शेती दिन साजरा!

 पाथर्डी प्रतिनिधी/बाळासाहेब कोठुळे

हरितक्रांतीचे प्रणेते डॉ . एम . एस .स्वामीनाथन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज श्री .दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे डॉ .अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय व दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत शेती दिन ‘ कृषि तंत्र विद्यालयात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी चितळी येथील आदर्श शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार श्री . बाळासाहेब कोठुळे यांची अध्यक्षीय उपस्थिती होती .यावेळी शाश्वत शेती काळाची गरज या विषयावर डॉ . एस . जे . देशमुख यांचे व्याख्यान झाले .कार्यक्रमावेळी प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य श्री . सुनील पानखडे यांनी भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते डॉ . एम . एस .स्वामीनाथन यांच्या जीवन कार्याचा पट उलगडला .तसेच शाश्वत शेतीचे येणाऱ्या काळात असणारे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले .कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ . एस. जे .देशमुख यांनी हरितक्रांतीचे प्रणेते नॉर्मन बोरलॉग व डॉ .एम . एस . स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीचा एकंदरीतच प्रवास याविषयी सुंदर विवेचन केले . आधुनिक पद्धतीने शेती करत असताना पर्यावरण पूरक व जैवविविधतेचे संवर्धन करून आजच्या कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात मार्गक्रमण करायला हवे . तसेच मानवी आरोग्याला व पर्यावरणाला हानिकारक असलेल्या रासायनिक कीटकनाशके , खते यांचा वापर मर्यादित पद्धतीने करून सेंद्रिय व जैविक पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करायला हवा . असे प्रतिपादन व्याख्यानातून यावेळेस करण्यात आले .आपल्या अध्यक्षीय भाषणातून आदर्श शेतकरी तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री .बाळासाहेब कोठुळे यांनी कृषी क्षेत्रात पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञान या दोघांची सांगड घालून व्यवस्थापन करणे मानवी आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .यावेळेस त्यांनी आपल्या खास शैलीत त्यांची स्वतःची स्वरचित कृषि विषयक कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली.त्याचबरोबर हे कृषी विद्यालय विद्यार्थ्यांकरिता राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल श्री . कोठुळे यांनी कृषी तंत्र विद्यालयाचे विशेष कौतुक केले .या कार्यक्रमासाठी डॉ . अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थी , विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते . या कार्यक्रमात ओंकार मरकड या विदयार्थ्याने आपले मनोगत यावेळी व्यक्त केले . कार्यक्रमाचे आभार द्वितीय वर्ष वर्गाचा विद्यार्थी ऋषिकेश सरगड याने मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक कु .ऋतुजा पुरनाळे यांनी केले होते . कृषि तंत्र विद्यालयात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , विश्वस्त मंडळ व सचिव यांनी विशेष कौतुक केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!