भोपला येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातील १ मे पासून डाॅक्टर झाले फरार? पशुपालक झाले आहेत त्रस्त! पशुवैद्यकीय उपचार घ्यायचा कुठे?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील भोपला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डाॅक्टर एक मे पासून दवाखान्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे पशुपालक व गावकरी त्रस्त झाले आहेत कारण एखाद्या पशुला काही आजार झाला तर खाजगी डॉक्टरांन कडून उपचार घ्यावे लागतात मग भोपला येथे पशुवैद्यकीय दवाखाना काय शोभेला आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण गावात असलेली पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत भुत बंगला आहे की काय अशी झाली आहे कारण तेथे अनेक महीण्या पासुन कागदोपत्री नोकरीला असलेले डाॅक्टर हजर नसतात घरी बसून पगार घेतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण जेथे नोकरी करायची आहे तेथे १ मे पासून हजर नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे मग डाॅक्टर गेले कुठे फरार झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच असे डॉक्टरांना शासन पगार कशासाठी देते अशा डाॅक्टरला निलंबित करण्यात यावे अशी मागणी भोपला येथील नागरिकांन कडुन करण्यात येत आहे.





















