Homeताज्या बातम्याराशीन येथे महात्मा फुले चौकाची तोडफोड – दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी :...

राशीन येथे महात्मा फुले चौकाची तोडफोड – दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी : स्वाती कातखडे

जनक्रांती न्युज/ प्रतिनिधी पाटोदा

राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले चौकाची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या घटनेचा सावता सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. सेनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती कातखडे यांनी प्रशासनाकडे दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.स्वाती कातखडे म्हणाल्या, “महापुरुषांचा अपमान करणारे समाजकंटक समाजात तेढ निर्माण करत आहेत. जर अशा व्यक्तींवर वेळेवर कठोर शिक्षा झाली नाही, तर जनतेचा संयम सुटेल आणि आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल.”या प्रकारामुळे सामाजिक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं असून, सावता सेनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, तात्काळ दोषींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.प्रशासनाकडून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात असून, चौकशी सुरु असल्याची माहिती मिळते. मात्र दोषींवर लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी नागरिक व विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!