पद्मश्री शंकरबापू विद्यालयात साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी!
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
धाराशिव :-कळंब तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयात आज सामाजिक न्यायाचे प्रणेते अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महान विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. परमेश्वर पालकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीवर प्रकाश टाकला त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा व देशप्रेमाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर आधारित कविता आणि लोकगीतांचे सादरीकरण केले तसेच टिळकांच्या कार्यावर आधारित भाषणे सादर केली शिक्षकांनीही या दोन्ही महापुरुषांच्या योगदानावर विचारमंथन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. बाबासाहेब दराडे यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





















