मी कधी जातीवादी नाही,जातिवाद केला नाही, इथुन पुढे करणार नाही/१९ ऑगस्ट पर्यंत आरोपींना अटक करा -मनोज जरांगे पाटील
बीड/प्रतिनिधी
बीड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या कुटूंबियांना न्याय देण्याच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी सर्वधर्मिय बैठकीचे आयोजन केले होते स्व. महादेव मुंडे यांची क्रूर हत्या ही आजही प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे. इतका काळ उलटून गेला, पण आरोपी मोकाट असणे ही न्यायव्यवस्थेच्या गंभीर अपयशाची कहाणी आहे.काल बीडमध्ये झालेल्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय बैठकीत मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. ही केवळ एक बैठक नव्हती, ही लोकशक्तीची आणि अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या जाणीवांची एकजूट होती.ज्ञानेश्वरी ताई मुंडे न्यायासाठी आजही झगडत आहेत, पण त्या एकट्या नाहीत. त्यांच्यासोबत आता एक संपूर्ण समाज उभा आहे, जागरूक, संघर्षशील आणि न्यायासाठी निर्धारलेला आता ही लढाई व्यक्तीची राहिलेली नाही. ही लढाई व्यवस्थेच्या दडपशाहीविरोधात उभी राहिलेल्या लोकशक्तीची आहे. जोवर न्याय मिळत नाही, तोवर संघर्ष थांबणार नाही असे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील काल झालेल्या बैठकीत म्हटले आहे तसेच जरांगे पाटील यांनी म्हटले की मी जातीवादी नाही जातीवाद कधी केला नाही तसेच करणार सुध्दा नाही तसेच धनगर व मुस्लिम समाजाला सुध्दा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





















