साळेगाव ते चिंचोली माळी रोड कागदोपत्री दाखवून निधी उचलुन खानारे भुरटे पुढारी कोण?/पुढारी झाले मालामाल?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामीण मार्ग खुसकीचा मार्ग आहे परंतु त्या रस्त्याला कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच चिंचोली माळी येथुन अनेक वाहने साळेगाव बाजार दीवशी वाहतूक होते दळणवळण होतात पन अनेक वर्षे झाले रस्ता दुरुस्त केला जात नाही अनेक पुढाऱ्यांनी चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्यावर कागदी घोडे नाचवून निधी हडप केला आहे परंतु रस्त्यावर साधे डांबर सुध्दा टाकले नाही असे अनेक पुढारी आहेत ज्यांनी चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्याच्या नावाखाली जनतेला वेड्यात काढले आहे निवडणूक तोंडावर आश्वासन देऊन जातात नंतर निवडून येतात कागदी घोडे नाचवून निधी मंजूर करून हडप करतात व पुढच्या निवडणुकीत नंतर तोंडवर करुन येतात तसेच अनेक भुरट्या पुढाऱ्यांनी ज्यांच्या त्यांच्या काळात कागदोपत्री काळाबाजार करून अनेकदा निधी उचलुन स्वतःच्या पोटाची खळगी भरली आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















