संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पारावरच्या चांवडी बैठकीला तुफान गर्दी? २९ ऑगस्टला मुंबईला जाण्याचा दीला नारा!
धाराशिव/प्रतिनिधी
शहरातील मराठा सेवकांचे फोन खणखणले. समोरून पाटील धाराशिवला येत आहेत, असा निरोप दिला जातो. ते का येत आहेत, कोठे जाणार आहेत, कार्यक्रम काय, याचा कसलाही सुगावा नाही. ठरल्याप्रमाणे तीन वाजण्याच्या सुमारास जरांगे-पाटील यांचा ताफा धडकतो अन् वाहने थेट कारी गावाकडे वळतात.असा हा गुप्त दौरा का, याचा उलगडा खुद्द जरांगे-पाटील यांनीच केला. समाजाची जागरूकता तपासण्यासाठी हा असा दौरा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची दिशा ठरली आहे. २९ ऑगस्ट रोजी आता थेट मुंबईतच आंदोलक धडकणार आहेत. याअनुषंगाने सध्या गावोगाव तयारी केली जात आहे. दरम्यान, आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील हे नियमित तयारीचा आढावा घेत आहेत. मराठा आरक्षण लढ्याला धार मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांच्या भेटीसाठी, चर्चेसाठी जरांगे-पाटील यांनी बुधवारी दुपारी अचानक आपला मोर्चा इकडे वळवला.कोणतीही पूर्वसूचना जिल्ह्यातील मराठा सेवक किंवा समाजबांधवांना दिली नव्हती. ते कारी गावात पोहोचल्यावर अचानक दौऱ्याबाबतची स्पष्टता आली. तोवर कारीसह परिसरातील गावखेड्यातील मराठा बांधव गावामध्ये दाखल झाले. हजारोंच्या उपस्थितीत गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.आगामी आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे-पाटील हे चावडी बैठका घेत आहे. कोणताही तामझाम न करता गावातील उपलब्ध चावडीवर बसून समाजबांधवांशी आंदोलनाच्या अनुषंगाने संवाद साधला जात आहे. चर्चा घडवून आणली जात आहे. कारीत अशीच ही बैठक सायंकाळी ७ वाजता घेण्यात आली.





















