Homeताज्या बातम्यावाल्मीक कराडला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ?कोर्टात न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे...

वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ?कोर्टात न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ लावले, पत्नी अन् भावाला भयकर दृश्य पाहून रडू कोसळलं !

वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ?कोर्टात न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ लावले, पत्नी अन् भावाला भयकर दृश्य पाहून रडू कोसळलं !

बीड/प्रतिनिधी

देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उब न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरकारी पक्षाने बाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशाप्रकारे निर्दृणपणे हत्या केली, याचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले. यावेळी संतोष देशमुख यांना सुदर्शन पुले, विष्णू घाटे आणि त्याच्या साथीदारांनी कशा पद्धतीने मारते, याचे व्हिडीओ न्यायालयात दाखवण्यात आले. सुदर्शन मुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती. या सगळ्याचे व्हिडीओ उथ न्यायालयात दाखवण्यात आले. ही सुनावणी सुरु असताना संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख हेदेखील न्यायालयात होते. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे हे व्हिडीओ पाहून या दोघांना रडू कोसळले.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला. हत्याकांडाशी संबंध नसून गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडच्यावतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची उर्वरीत सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असताना वाल्मिक कराडला कारणे दिलेली नाही, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला प्रकरणात गोवल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या संतोष देशमुखांना मारहाण वतीने करण्यात आला. त्यावर अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. याघटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशीलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफित मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखविण्यात आला. या सगळ्या पुराव्यांवरुन वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद गिरासे यांनी केला.वाल्मिक कराड याने आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यासह सुदर्शन घुलेचे कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे, आदी घटनाक्रम सरकारी वकिलांनी विस्तृतपणे मांडला. सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर वाल्मिक कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यांना निर्जन जागी नेऊन नृशंस मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. वाल्मिक कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत होता, अशी बाजू गिरासे यांनी मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!