राजे तुम्हाला आझाद मैदान सापडेना का? मराठा समाज चिखलात आणी तुम्ही महालात!
मुंबई/प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दोन दिवसांपासून उपोषण करत आहेत आणि लाखोंच्या संख्येने समाज मुंबईत तीन दिवसांपासून असून मैदानावर तर कसल्याच सुविधा नाहीत चिखल झाला खाण्या पिण्यासाठी हॉटेल बंद, पाचई लाइट बंद, खाऊ गल्ल्या बंद मिळेल ते खायचे आणि जागा असेल तिथे झोपायचे प्रचंड हाल आंदोलनकर्त्यांना सोसावे लागत असतांना छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे नेमके आहेत तरी कुठे समाज चिखलात बसलेला असतांना तुम्हीं महालात बसून चालेल का? समाज अडचणीत असतांना जर म्ही येणार नसाल तर शेवटी तुमच्या वर जेंव्हा जेंव्हा कोणी आरोप प्रत्यारोप केला जातो तेंव्हा हाच समाज तुमच्यासाठी धाऊन येतो आरोपांचे खंडन करतो मात्र त्याच समाजाची लेकरं वयोवृद्ध माता माऊली चिखलात असेल, सरकारच्या अन्यायाला तोंड देत असेल आणि असल्या वेळेत तुम्हीं सरकारला जाब विचारून समाजाची तळमळ आणि हाल दाखवून देणार नसाल तर समाज तुमच्या भूमिका कदापिही विसरणार नाही याची देखील दखल आणि आठवण तुम्हाला असावी स्त्मष्ठमातील मुलांचे आंदोलन कत्यांचे हाल भयंकरच आहेत आणि प्रशासन एखाद्या दहशतवादी मुंबईत घुसल्यासारखे सुरक्षा बळ वाढवत आहे त्याबद्दल कोणाचे काही म्हणणे नाही मात्र आंदोलन कल्यचेि हाल पाहून सरकार ला तिननी राजांनी जाब विचारला तर बरे होईल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.
चौकट:-
कॉलर उडवा आणि सरकारला जाब विचारा!
आणि सरकारला जाब विचारा, समाज आंदोलन करतोय आणि तुम्ही अशी पिळवणीक नेमकी का करताय? सोय सुविधा नाहीत, पाणी नाही लाईट नाही, नेमकं चाललंय तरी काय? समाजाचे वाली तरी तुम्हीं व्हा, पाटील खिंड लढवत आहेत तुम्ही समाजाच्या पाठीमागे तरी रहा ही भावना आंदोलनकर्त्यांची आहे राजेंहो…





















