मा. सघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृत्वात 29ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी लढा चालू असताना सुगाव गावात दुर्दैवीघटना घडली !
बदापूर/ प्रतिनिधी
गावातील मराठा सेवक चव्हान नितीन मानीकराव मराठा आरक्षणाच्या बातम्या सतत आयकुन आरक्षन मिळते की नाही ? या विवंचनेत 30 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटने नंतर सुगाव गावातून मुंबईला गेलेले 90 मराठा सेवक मुंबई वरून अंतिमसंस्कार साठी त्यांना परत यावे लागेल.
घरामध्ये, भावकीत, गावात शोकाकुल वातवरण असताना देखील त्यांचे चुलत भाऊ मराठा सेवक चव्हाण संतोषभेया गोपीनाथराव व त्यांचे मित्र महेश अण्णा शिंदे,धनराज टिळक,समाधान टेकाळे.30 ऑगस्ट चा अंत्यविधी उरकून रात्री परत मुंबई आझाद मैदान दादाच्या समर्थनासाठी गेले.जेव्हा सरकार च्या शिष्ट मंडळने मराठा आरक्षण जाहीर केले दादानी उपोषण सोडले त्यांचे हे चार शिलेदार,मराठा सेवक सुगाव मधून साक्षीदार झाले. करिता सुगाव गावातून समस्त मुस्लिम समजा तर्फे शुभेच्या देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी पटेल रियाज सर,पटेल आझाद,शेख बखतावर,पठाण सादेख,पठाण युसूफ भाई,पठाण बाबू भाई,पठाण अल्ताफ,पठाण बाबा,पठाण इक्बाल,शिंदे बाबुराव,टेकाळे बंडू,ओम पवार,पवार अनिल,गणेश टेकाळे ,सोमवंशी ज्ञानोबा,गावातील जेष्ट मुस्लिम मराठा बांधव उपस्थित होते.





















