‘माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध’ राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- “माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा २०२५” अंतर्गत सहभाग घेतलेल्या राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव लकडे होते तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे परमेश्वर पालकर,पोउनि शिराज पठाण,व्यवसायीक विठ्ठल माने , पत्रकार अप्पासाहेब शेळके,संयोजक प्रविण तांबडे,प्रियंका तांबडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मोठ्यासंख्येने विद्यार्थी,शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक प्रविण तांबडे यांनी तर सुत्रसंचलन प्रा. महादेव गपाट यांनी केले ‘बेस्ट टीचर’ पुरस्काराचे मानकरी यंदाच्या बेस्ट टिचर पुरस्काराचे वाकडी (के) येथील जिप शाळेच्या सहशिक्षिका शोभा गायकवाड,शिंदे राजेभाऊ विष्णू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इटकूर जिप शाळेच्या अंजली यादव या मानकरी ठरल्या.श आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.राज्य स्तर पवार रणवीर राजेंद्र टोंणे सिद्धी वैभव,नलवडे काव्या प्रकाश ,आदित्य नारायण वरपे, विकास आंधळे काळे, प्राजक्ता विलास वाघमारे कविता विकास विभाग स्तर जिल्हा स्तर तालुका स्तर अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली विकास आकाश धायगुडे,चिंचकर सिद्धी सागर,नेहा सुभाषचंद दिनकर,राजनंदिनी प्रमोद शितोळे,नागेश हनुमंत वाघमारे,शिंदे प्रवीण विकास, पवार रणवीर राजेंद्र ,ऋतुजा विलास बोबडे,धाबेकर शौर्य सुहास ,रणदीवे शौर्य महिंद्र,हर्ष सचिन नांदूरकर,अनुजा प्रकाश थापडिया,अमृता औदुंबर शिंदे,काळे स्नेहल सुरेश,शितोळे विहान,विकी धाबेकर,सार्थक सुहास माळी, कैवल्य नागनाथ ,शिंदे वेदांत संतोष,शिंदे वेदांत राजाभाऊ,कुंभार श्रेया रवी,महाजन स्वराज विलास,सुरवसे आरुषी सुधीर,शेख अरफत सलीम विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रथम विद्यार्थ्यांचा टॅब,गोल्ड मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र तर द्वितीय विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती,ट्रॉफी,स्कूल बॅग,गोल्ड मेडल व प्रमाणपत्र तर तृतीय विद्यार्थ्यांचा रोख रक्कम,ट्रॉफी,स्कूल बॅग,गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.





















