महामार्गावर लुटमारीचा कहर; दरोडेखोर मोकाट, पोलिस गायब! एसपी साहेब,गस्त वाढवा, पोलिस दाखवा नाहीतर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग दरोडेखोरांच्या हवालीच राहील !
बीड/प्रतिनिधी
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वर तेलंगणाहून साईदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कुटुंबाला लुटण्यात आल्यानंतर प्रवाशांत भीतीचे वातावरण, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या चार दरोडेखोरांनी गाडीची काच फोडून ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हिसकावला. घटना घडली, गुन्हा नोंद झाला पण दरोडेखोर कुठे? गस्त पथकांनी रात्री नेमकं काय पाहिलं ? धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ वर चोरी लुटमारीच्या घटनांनी वाहनचालकांचा आजचा रात्रीचा प्रवास अक्षरशः जीव घेणारा होत चालला आहे. वरवर सूचना देत सावधान रहा म्हणणारे पोलीस, पण प्रत्यक्ष गस्त आणि गुन्हे रोखण्याची जबाबदारी मात्र कोणाच्या हाती? असा संतप्त सवाल महामार्गावरील प्रवासी आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत. बुधवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास गेवराई तालुक्यातील गडीजवळ वडगाव ढोक फाट्यावर तेलंगणाहून साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कुटुंबावर तोंडाला रुमाल बांधलेल्या चार दरोडेखोरांनी झडप घातली.लोखंडी रॉडसारखी हत्यारे दाखवून कुटुंचातील सदस्यांची मारहाण, गाडीची काच फोडून महिलांचे दागिने व पुरुषांच्या गळ्यातील चेन असा तब्बल ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हिसकावून दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला, तरी दरोडेखोर मात्र अद्याप अभी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून धुळे-सोलापूर महामार्गावर लुटमारीच्या घटना सतत बाढत आहेत. रात्री गस्त असल्याचे सांगितले जाते,मग इतक्या घटना कशा घडतात? चोरट्यांना पकडण्याऐवजी नागरिकांनाच सावधान रहा, असे सांगणे म्हणजे जबाबदारी झटकणे नाही का? महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस, सुरक्षा पथक सर्वांची चमकदार बाहनं दिसतात पण धोकादायक ठिकाणी मात्र भीषण अंधार आणि दरोडेखोरांचे राज्य, अशीच परिस्थिती नागरिक अनुभवत आहेत. पोलीस यंत्रणेकडे वाहनं आहेत, साधने आहेत, जवान आहेत पण परिणाम? शून्य महामार्गावर प्रवास करणा-यांना स्वतःच्या जीवाची, दागिन्यांची, मुलांच्या सुरक्षेची चिंता सतत जाम देत आहे. पोलिस प्रशासनाने जर तातडीने पावले उचलली नाहीत तर महामार्गावरच्या लुटमार प्रकरणांची साखळी वाढणार हे निशित आहे.





















