मराठा सेवा संघाच्या वतीने अभियंता दिन साजरा !
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- कळंब येथे दि.१५ सोमवारी मराठा सेवा संघाच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला १५ सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने कळंब येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतातील पहिले महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र नवी मुंबई येथे कार्यरत असणारे उपअभियंता प्रकाश धस यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे अतुल गायकवाड व महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा ज्योती सपाटे यांच्या हस्ते करण्यात आला. अभियंते हे आधुनिक समाजाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या विचारसरणीमुळेच आपण तांत्रिक प्रगतीच्या वाटेवर आहोत असे अभियंत्याविषयीचे गौरवोद्गार प्रा. डॉ. संजय सावंत यांनी आपल्या भाषणात काढले. यावेळी प्रा. जगदीश गवळी, अरविंद शिंदे, अनिल फाटक, बाबुराव शेंडगे, ईश्वर काळे, सागर बाराते, सुंदर लोमटे, प्रदीप फरताडे, बापू माने आदी उपस्थित होते.





















