नपुंसक मेंगे चाळे करायला आहे,समोरा समोर आला असता तर ते मेला असता नाहीत मी मेलो असतो/जरांगे पाटलांचा कडवट भाषेत आ.धनंजय मुंडे यांच्या वर हल्ला बोल/ स्वत: धनंजय मुंडे, असे आठ ते दहा आरोपी आहे – जरांगे पाटील
जालना/प्रतिनिधी
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी आरोपींना 2 कोटींची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी आता थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवलं आहे. मनोज जरांगे यांनी हे आरोप करताना दोन आरोपींच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच त्यांनी आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्या संभाषणाची देखील ऑडिओ क्लिप ऐकवली. संबंधित ऑडिओ क्लिप्सची आम्ही पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपच्या आधारे धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं. आपण नार्को टेस्ट करायला तयार आहोत, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी चॅलेंज स्वीकारलं मनोज जरांगे काय म्हणाले?”हा चेष्टाचा विषय नाही. अशी वेळ कुणावरही येऊ नये. त्याचं आणि माझं काही वैर नाही. ही घटना त्याने करायला नको होती. ते त्याने केलेलं आहे. माझ्यावर अशी वेळ येते म्हणजे माझ्या गरिब समाजावर कुणावरही अशी वेळ येत असेल. मर्यादेच्या पलिकडे त्याने गोष्टी केल्या. त्याला या गोष्टी करायची गरजच नव्हती. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी, ते यामध्ये मिक्स करण्याची काही गरज नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.मी सांगतानाच सांगितलं, मला अमूक माहिती मिळाली आणि ती पोलीस प्रशासनाला सांगितली. चौकशी करा. याच्यात इतके लोकं आहेत. आता धरलेले दोन आणखी दुसरे दोन, स्वत: धनंजय मुंडे, असे आठ ते दहा आरोपी आहेत. या सर्वांची चौकशी नको व्हायला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो. तो नार्को टेस्ट म्हणतो ना, मी सर्वात आधी नार्को टेस्ट करायला तयार आहे”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी चॅलेंज स्वीकारलं आहे.





















