धानोरा(बु) येथे मराठा सेवक पप्पू आदनाका यांच्या वर ऑट्रासिटी गुन्हा दाखल/अंबाजोगाईच्या आकाची मग्रुरी वाढली?
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु. येथे ग्रामपंचायत लिपिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी वैजनाथ तात्याराव बनसोडे (वय 47, व्यवसाय नोकरी, ग्रामपंचायत लिपिक, रा. धानोरा बु.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास आरोपी सोमनाथ उर्फ पप्पू ज्ञानोबा आदनाक, नारायण ज्ञानोबा आदनाक, स्वप्निल श्रीकृष्ण आदनाक व अमर जगन्नाथ आदनाक (सर्व रा. धानोरा बु.) यांनी संगनमत करून त्यांना गावात असताना जातीवाचक शिवीगाळ केली.त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला धरून धक्काबुक्की केली, चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपींनी बनसोडे हे करत असलेल्या शासकीय कामात देखील अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चारही आरोपींवर मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे करीत आहेत.तरी 29 ऑगस्टला चलो मुंबई गावातून कोण कोण येणार यादी करणे गाव अंधारात असताना डेपी बसवली पुढाकार घेतला मराठा सेवक पप्पू यांच्या वर खोटा ऑट्रीसीटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नागरिकांन मध्ये बोलले जात आहे .





















