डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन रद्द/आमदार नमीता मुंदडा तुमचा डाव असफल?
केज/प्रतिनिधी
आरोग्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रामध्ये स्वतः चे अस्तित्व निर्माण करून जनसामान्यांमध्ये नाळ जोडणारे डॉ. अशोक थोरात यांना जिल्हा शल्यचिकित्सक असताना राज्य शासनाने निलंबित केले होते. डॉ. अशोक थोरात यांचे अखेर निलंबन शासनाने रद्द केले आहे. परंतु डॉ. अशोक थोरात यांना बीडलाच पुनर्नियुक्ती न देता त्यांची राज्य कामगार विमा सोसायटीच्या संचालक पदी प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आपले निलंबन रद्द व्हावे यासाठी डॉ. अशोक थोरात यांनी न्यायालयीन लढाई सुरु केल्यानंतर शासनाने ही भूमिका घेतली आहे. बीडचे जिल्हाशल्य चिकित्सक म्हणून डॉ. अशोक थोरात यांची कारकीर्द चांगली राहिली होती. मात्र कोरोना काळातील काही गोष्टींचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात ११ अधिकाऱ्यांची नावे असताना केवळ डॉ. अशोक थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. शासनाच्या निलंबन आदेशाला डॉ. अशोक थोरात यांनी मॅट व मा. उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. यावर उच्च न्यायालयाने मॅटला कालबद्ध सुनावणीच्या निर्दे श दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. अशोक थोरात यांच्या निलंबनचे आदेश रद्द केले असून त्यांना प्रतिनियुक्तीवर राज्य कामगार विमा सोसायटीच्या संचालकपदी नियुक्ती दिली आहे. अखेर डॉ. अशोक थोरात यांचे शासनाने निलंबन रद्द केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















