चिंचोली माळी येथील शेतात बसवलेला सिसिटीव्ही कॅमेरा काढा/उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयाला महीलेचे निवेदन!
केज/प्रतिनिधी
चिंचोली माळी येथील शेतात बसवलेला सिसिटीव्ही कॅमेरा काढा असे निवेदन चिंचोली माळी येथील महिला कविता गलांडे यांनी महीलेचे निवेदन उविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालयाला दिले आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की जाणीवपूर्वक लावलेला सीसीटीव्ही कैमेरा काढावा अशी महीलेची मागणी आहे अर्जदार कवीता प्रकाश गलांडे, वय उप व्य. घरकाम रा. चिंचोली माळी विषयी तक्रारी अर्ज पोलीस स्टेशन केज येथे दि 12/06/2025 रोजी देण्यात आली होती परंतु चौकशी अंमलदार यांनी फार काही म्हणणे ऐकले नाही मी महिला म्हणून मला असुरक्षित वाटत आहे हे समजून. घेतले नाही. सदर सीसीटीव्ही हा माझ्या घराचे पाठीमागील बाजूस लावलेला आहे, घराचे पाठीमागे अंघोळीची बाथरूम, कपडे धुण्याची जागा आहे. मी राहत असलेले घर हे आमको सामाईक शेतीमध्ये आहे. माझ्या सास-यांनी शेतीची वाटणी झालेली नाही. माझे दीर कमलाकर गलांडे सदर जमीन आहे परंतू माझ्या सासऱ्यांनी अल्पभूधारक शेतकरी वे शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर जमीन ही माझे पत्ती प्रकाश गलांडे हे वयाने लहान असल्याने त्यांच्या नावे न करता कमलाकर गलांडे यांचे नांवे केली होती याचाच आधार घेवून त्यांनी जाणीवपूर्वक पणे सदर सिसिटीव्ही कॅमेरा लावलेला आहे.तरी पोलिस उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयानी तो कॅमेरा काढावा अशी मागणी महीलेने केली आहे.





















