Homeताज्या बातम्याजलजीवन‌’च्या प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा/पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील!

जलजीवन‌’च्या प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा/पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील!

जलजीवन‌’च्या प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा/पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील!

शिर्डी अहिल्यानगर| प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा अहवाल चालू महिनाअखेर सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष योजनांची पाहणी करावी, तसेच कामामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नांबाबत उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.राहाता पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत जलजीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढावाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, तालुक्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलजीवन मिशनच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंते गणेश भोगावडे, हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी विवेक गुंड आदी उपस्थित होते.मंत्री विखे पाटील म्हणाले, पाइपलाइन टाकताना रस्त्यांचे नुकसान झाले असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील योजना ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ममदापूर येथील टाक्या व वाकडी येथील पाइपलाइनचे काम पर्यायी मार्गाने पूर्ण करावे. रस्ते खोदल्यानंतर माती उघड्यावर पडू नये यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. धनगरवाडी येथील कामे तात्काळ पूर्ण करावीत. कडीत येथील जुन्या योजनांतील साचलेली घाण त्वरित काढावी. उन्हात पडून खराब झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी.सोनगाव योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्यासाठी महसूल व ग्रामविकास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा. पाइपलाइनसाठी डांबरी रस्त्यांचे खोदकाम टाळावे. जिथे रस्ते खणण्यात आले आहेत, तेथील माहिती संकलित करून अहवाल सादर करावा.योजनेची कामे पूर्ण करताना संबंधित ठेकेदारांनी शासकीय यंत्रणांना विश्वासात न घेतल्याने गावातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!