केज येथील सिमेंट रस्ता, नाली बांधकामाचे उद्घाटन!
केज/प्रतिनिधी
केज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्या प्रभाग क्र. ७ मधील फुले नगर भागात सिमेंट रस्त्याचे व नाली बांधकामाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हारून इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.केज शहरातील फुले नगर भागातील काही भाग हा नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मध्ये येत असून हा प्रभाग नगराध्यक्षा सीता बनसोड यांचा आहे. या भागातील मुख्य रस्त्यावरून श्रीकांत उजगरे यांचे घर ते राजेंद्र सोनवणे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता व नालीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे प्रश्न सोडविण्याची नागरिकांची मागणी होती. या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हारून इनामदार व नगराध्यक्षा सीता बनसोड यांनी दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत रविवारी सिमेंट रस्त्याचे व नाली बांधकामाचे उदघाटन केले. रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी इनामदार व बनसोड यांचा सत्कार करीत आभार मानले.





















