कळंब शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना मुलभूत सुविधा द्या?निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- कळंब शहरातील सर्वच भागातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत व नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात नसता आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दिलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे,माजी नगरसेवक सतीश टोणगे,संजय घुले,भैय्या बावीकर,बाळासाहेब धस यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धनेगाव धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानाही, शहरात चार चार दिवस नळाला पाणी येत नसल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे शहरात घंटा गाडी फिरत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने साथीचे रोग पसरू लागले आहेत तसेच गणपती बाप्पा मिरवणुकी साठी प्रत्येक भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पाणी साचले आहे.गांधी नगर,सावरगाव पुनर्वसन,बायपास रोड,विद्याभवन शाळा परिसर,एकशे एक नगर आदी भागा तील रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत रस्त्यावरील जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात नसता आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे,माजी नगरसेवक सतीश टोणगे,संजय घुले,बाळासाहेब धस यांनी दिला आहे.





















