आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनची गुर्मी जानार कधी ? शासनाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे खाल्ले रमेश पाटील यांचा अरोप ,आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन घेण्यासाठी नकार!
केज/प्रतिनिधी
केज शहरा लगत काही शेतकऱ्यांच्या वहितीच्या जमीन आहेत याच जमिनीवर अवादा कंपनीकडून पोल लावले जात आहेत त्या विरोधात दहा ते बारा नागरिक उपोषण करत आहेत. अवादा कंपनीची मनमानी ने व स्थानिक गुंडाची मदत घेऊन यांच्या शेतात खांबे लावत होते व उपोषण कर्त्यानां विचारात न घेता किंवा परवानगीशिवाय हे अनधिकृत खांब लावले जात होते तसेच वहिती जमीन कमी असल्याने जर खांबे लावले तर जमीन वहिती साठी कमी होईल त्या साठी दहा ते बारा जण दोन दिवसापासून केज तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत त्या पैकी काल सुभाबाई गोपाळ भोसले वय ५८ यांचे उपोषण स्थळीच मृत्यू झाला आहे. तरी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी आवाज उठवला आहे व शासनाच्या कर्मचाऱ्यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांन कडून पैसे खाल्ले असा अरोप रमेश पाटील यांच्या कडुन करण्यात येत आहे व त्यांची काॅल रेकाॅर्डींग व्हारल झाली आहे तरी रमेश पाटील यांनी केलेले अरोप सत्य की असत्य याचा तपास प्रशासन करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.अजून आवादा कंपनी किती लोकांचे बळी घेणार आहे त्यामुळे आवादा कंपनीचे संचालक व संबंधित कर्मचाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी ही मागणी सर्वसामान्य करीत आहे.आवाजा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही पाटील आणि कात्री यांना फोन लावण्यात आला होता फोन का घेत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















