खासदार,आमदार गप्प गार आवादा कंपनीच्या विरोधात उपोषणास्थळी बळी गेला विषयावर पडले का शिराळ?
केज/प्रतिनिधी
केज शहरा लगत काही शेतकऱ्यांच्या वहितीच्या जमीन आहेत याच जमिनीवर अवादा कंपनीकडून पोल लावले जात आहेत त्या विरोधात दहा ते बारा नागरिक उपोषण करत आहेत. अवादा कंपनीची मनमानी ने व स्थानिक गुंडाची मदत घेऊन यांच्या शेतात खांबे लावत होते व उपोषण कर्त्यानां विचारात न घेता किंवा परवानगीशिवाय हे अनधिकृत खांब लावले जात होते तसेच वहिती जमीन कमी असल्याने जर खांबे लावले तर जमीन वहिती साठी कमी होईल त्या साठी दहा ते बारा जण दोन दिवसापासून केज तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत त्या पैकी आज सुभाबाई गोपाळ भोसले वय ५८ यांचे उपोषण स्थळीच मृत्यू झाला आहे. परंतु केज तालुक्यातील आमदार खासदार या विषयी गप्प गार का आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण दोन दिवस झाले आमदार, खासदार यांनी बळी गेलेल्या कुटुंबातील व्यक्तींना धीर देण्यासाठी सुध्दा गेले नाहीत संभाजी नगर वरुन येऊन सामाजिक कार्यकर्ते यांनी काल भेट दिली परंतु स्थानिक खासदार, आमदार साधी भेट देण्यासाठी सुध्दा गेले नाहीत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















