Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात अँड. मनीषा कुपकर पाटील यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीची जोरदार मागणी...

केज तालुक्यात अँड. मनीषा कुपकर पाटील यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीची जोरदार मागणी !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील सुर्डी गावातील झुंजार आणि लोकाभिमुख महिला नेत्या म्हणून परिचित असलेल्या अँड. मनीषा कुपकर पाटील यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीबाबत समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले व्यापक काम तसेच अलीकडेच झालेल्या बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी म्हणून मिळवलेले घवघवीत यश लक्षवेधी ठरले आहे.मनीषाताई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि गरजू घटकांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. विविध सरकारी योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देणे यासह अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी अग्रणी भूमिका बजावली आहे.मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाळपोळीच्या प्रकरणांत अन्यायाने अडकलेल्या अनेक मराठी तरुणांचे मोफत जामीन करून देत त्यांनी त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला. कोणत्याही वंचित, पीडित व्यक्तीने मदतीचे आवाहन केल्यास तात्काळ प्रतिसाद देणे ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक बाजू मानली जाते.त्यांच्या तडफदार नेतृत्वशैलीमुळे, कायदेविषयक जाणिवेमुळे आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे केज तालुक्यात त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना संधी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी नागरिक, महिला बचतगट, शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.“समाजाने दाखवलेला विश्वास मोठा आहे. केज तालुक्याच्या विकासासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असेही मनीषाताईंनी सांगितल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!